मोर्शी: घोडदेव शिवारात दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याने, अज्ञात वाहन चालकाविरुद्ध मोर्शी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
आज दिनांक 16 ऑक्टोबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार घोडदेव शिवारात दुचाकी अपघातात जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याने, दिनांक 15 ऑक्टोबरला रात्री नऊ वाजून 23 मिनिटांनी सचिन वासुदेव बनसोड राहणार दापोरी यांनी मोर्शी पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीवरून, अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. दिनांक 6 ऑक्टोंबर ला सकाळी दहा वाजता हा अपघात झाला असून, जखमी इसमाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला