तुमसर: नाकाडोंगरी येथे सार्व.कार्यक्रमात एकाला बंदुकीचा धाक देत जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी गोबरवाही पोलिसांच्या ताब्यात
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे दि. 1 नोव्हेंबर रोज शनिवारला रात्री 9 वा.च्या सुमारास शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी ठाकचंद मुंगूसमारे हे एका सार्व. कार्यक्रमात पूजा करीत असताना त्या ठिकाणी आरोपी तुमसर पं. स.माजी उपसभापती शिशुपाल गोपाले हे कार्यक्रम स्थळी आले असता कार्यक्रम बंद करण्यास सांगितले यावेळी दोघांत वाद चिघळला. याच वादात शिशपाल गोपाले याने टाकचंद मुंगूसमारे याच्यावर बंदूक ताणून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपीला गोबरवाही पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.