लातूर: लातूर महानगरपालिकेमार्फत मतदार यादी पाहण्यासाठी हेल्प डेस्क सुरू
Latur, Latur | Nov 27, 2025 लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर, १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करून प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली असून ती २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांकडून या प्रारूप यादीवरील हरकती व सूचना ३ डिसेंबर २०२५ पर्यंत मागविण्यात येत आहेत.