हवेली: लोणी स्टेशन येथे लिफ्टमध्ये महाविद्यालयीन तरुणीशी छेडछाड; नागरिकांनी आरोपीला चोप दिला
Haveli, Pune | Oct 9, 2025 शिवणकामासाठी कपड्यांचे कापड टेलरकडे देण्यासाठी जात असलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीशी लिफ्टमध्ये अश्लील वर्तन आणि छेडछाड केल्याची घटना लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती) परिसरात घडली. मुलीच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला.या प्रकरणी २० वर्षीय तरुणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, विशाल लक्ष्मण चाफेकर (वय २४, रा.कदमवाकवस्ती, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.