नागपूर शहर: नंदनवन घरफोडीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेने तिघांना ठोकल्या बेड्या
2 मे ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नंदनवन भागात झालेली मोठी घरफोडी उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट-४ ला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दशरथ ऊर्फ लकी साखरे या मुख्य आरोपीसह दोन अल्पवयीन साथीदारांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सोने-चांदीचे दागिने आणि ४ महागडी घड्याळे असा एकूण १ लाख ८९ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.चौकशीत नंदनवनमधील घरफोडीसह कलमना आणि अजनी परिसरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांचीही कबुली आरोपींनी दिली आहे. एकूण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.