शिरपूर: बिजासन घाटात दोन ट्रकांच्या अपघातातुन 2 तासांच्या प्रयत्नांनंतर जीव वाचवलेल्या चालकाचा धुळे मृत्यू
Shirpur, Dhule | Nov 21, 2025 मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात शिरपूर तालुका पोलीस चौकीसमोर 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातात कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकाला 2 तासांच्या प्रयत्नानंतर वाचविलेल्या चालकाचा अखेर धुळे येथील शासकीय रुग्णालयात 21 नोव्हेंबर रोज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.राहुल राजपूत वय 30, रा.विदिशा, मध्यप्रदेश असे मयत चालकाचे नाव आहे.