गरजू रुग्णांना तातडीच्या, गंभीर रुग्णसेवा तसेच सिझेरियन व सामान्य प्रसूती सेवा , इतर शस्त्रक्रिया , आंतररुग्ण सेवा , सोनोग्राफी , एक्सरे, रक्ततपासणी सेवा मोफत वेळेवर दिल्या बद्दल डॉ. धीरज लांबट वैद्यकीय अधीक्षक, ग्रा रु पवनी याना स्नमानचिन्
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित 'वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार' आणि 'महाआरोग्य सन्मान सोहळा २०२६' मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात भंडारा जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत, जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाशजी आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री ना. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.