अलिबाग: बालविवाह रोखण्यासाठी विशेष प्रबोधन अभियान, मंत्रालयात आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक
Alibag, Raigad | Oct 14, 2025 बालविवाह रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावी कार्यवाही सुरू आहे. तथापि काही भागांमध्ये अद्यापही काही प्रमाणात बालविवाहांच्या घटना आढळून येत असल्यामुळे या प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आज मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात वैयक्तिक स्तरावर प्रबोधन आणि जनजागृतीचे विशेष अभियान राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ११ ऑक्टोबर २०२५ (आंतरराष्ट्रीय कन्या दिन) ते २६ जानेवारी २०२६ (प्रजासत्ताक दिन) या कालावधीत “बालविवाहमुक्त महाराष्ट्रासाठी १०० दिवस” हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा आज आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, कर्जत, पेन, सुधागड, मुरुड, रोहा, पनवेल, खालापूर आणि माणगाव या तालुक्यांमध्ये सर्व उपाययोजना प्राधान्याने राबवाव्यात.