नागपूर शहर: ड्रिंक अँड ड्राईव्ह चेकिंगदरम्यान थरार; पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले : प्रमोद पोरे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सक्करदरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी 15 मे ला दुपारी 4:30 ला दिलेल्या माहितीनुसार सक्करदरा परिसरात 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' तपासणीदरम्यान एका मद्यधुंद कार चालकाने पोलीस कर्मचारी हर्षद वासनिक यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. आरोपीने वासनिक यांना कारच्या बोनटवर तब्बल १०० मीटरपर्यंत फरफटत नेले, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी दिली आहे.