विरार येथे सायबर गुन्हे जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले रोटरी क्लब ऑफ विरार न्यू विवाह कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रेडिंग सायबर क्राईम, सोशल मीडिया सुरक्षा, ऑनलाइन फसवणूक त्यापासून कशाप्रकारे बचाव करावा सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया आदींसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे मदन बल्लाळ, रोटरी अध्यक्ष उर्मिला काटकर, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.