नागपूर शहर: नागपुरात सोनसाखळी चोरणारी टोळी गजाआड; गुन्हे शाखेची धडक कारवाई
एकोणवीस मेला सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार सोनसाखळी विरोधी पथकाने धडक कारवाई करत सोनसाखळी चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली आहे.गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून शोध घेत विनय ऊर्फ विक्की शाहू आणि सचिन नथ्थू शाहू या दोन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी सोनेगाव आणि बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ८०,००0