नागपूर शहर: ई-सिगारेट तस्करीचे 'पुणे कनेक्शन' उघड; नागपूर पोलिसांकडून १६.५६ लाखांचा माल जप्त
31 मे ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रतिबंधित ई-सिगारेट विक्रीविरुद्ध नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत या तस्करीचे 'पुणे कनेक्शन' उद्ध्वस्त केले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यात छापा टाकून मुख्य पुरवठादार मोआझ एजाज खान याला अटक केली असून, त्याच्याकडून १६.५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.नागपुरातील 'मैफिल पान सेंटर'वर झालेल्या कारवाईनंतर या तस्करीचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचले.पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार, पथकाने पुण्याच्या बो