नागपूर शहर: सदर भागात भीषण अपघात; कारची धडक लागून सहा वर्षीय चिमुकलीसह 2 जण गंभीर जखमी
नागपूरच्या सदर पोलीस ठाणे हद्दीतील एलआयसी चौक ते काटोल नाका ओव्हरब्रिजवर काल ८ जून ला दुपारी 4:45 वाजता च्या दरम्यान भीषण अपघात झाला. भरधाव टोयोटा ग्लॅन्झ कारने एमपी २८ सीबी ८६३८ समोरील फॉक्सवॅगन कारला जोरदार धडक दिली, ज्यामुळे पाठीमागून येणारी आणखी एक कारही धडकली. या अपघातात प्रसाद बोकडे यांची मुलगी 'साईशा' आणि मित्र 'आकाश गजभिये' गंभीर जखमी झाले.