शिरोळ: शिरोळ येथील हल्ल्यातील तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू, सात संशयित आरोपींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
शिरोळ येथे जुन्या भांडणाच्या वादातून एक तरुण गंभीर जखमी झाला असून,मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.ही घटना रविवार दिनांक ८ जून रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास शिरोळ गावच्या नदी वेस,तिन तिकटी जवळील रोडवर व लगतच्या शेतात घडली.फिर्यादी अमोल संतोष सावंत वय २०,रा.शिवाजीनगर,शिरोळ याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सात संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.