खालापूर: स्मार्ट मीटरला खोपोलीकरांचा विरोध
रायगडात सर्वत्र स्मार्ट मीटरला विरोध होत असताना खोपोली वीज वितरण कंपनीच्या आधिकार्यानी शहरातील नीलकंठ व्हॅली या गृहसंकुलात चार दिवसांपूर्वी रहिवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेचे काम हाती घेतल. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी विरोध केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर ही प्रक्रिया थांबली असली तरी पुढील काळात स्मार्ट मीटरचा प्रश्न खोपोलीत पेटणार या ठिणगी वरून नक्की होत आहे.