अमरावती: शेफ विष्णू मनोहरचा सलग 25 तास डोसे बनविण्याचा विक्रम,मोफत डोसे खाण्यासाठी उसळली गर्दी
आज २० ऑक्टोबर सोमवार रोजी दुपारी १२ वाजता मिळालेल्या माहितीनुसार विख्यात शेफ विष्णू मनोहर हे अमरावती शहरात सलग 25 तास डोसे बनवण्याचा विक्रम केलाय.. सकाळी 7 वाजल्यापासून चवदार डोसे बनविण्यास सुरुवात झाली असून या डोशांची चव चाखण्यासाठी खवय्यांची गर्दी उसळली.. मागील वर्षी दिवाळीच्या पर्वावर नागपूर शहरात सलग 24 तास डोसे बनवण्याचा विक्रम शेफ विष्णू मनोहर यांनी केला होता.आता आपलाच विक्रम मोडण्यासाठी त्यांनी अमरावती शहरातील गुणवंत लॉन याठिकाणी 25 तास डोसे बनवून त्यांनी नवीन विश्वविक्रम केला..