घनसावंगी: तीर्थपुरीत दोन घरफोड्या; सव्वा लाखांचा ऐवज लंपास
जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे माळी गल्ली परिसरात सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी दोन घरांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी एका घरातून सुमारे ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल, तर दुसऱ्या घरातून ४० हजार रुपयांची रोकड व दागिने चोरून नेले. घरफोडीनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. तीर्थपुरी परिसरात अलीकडील काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत