नागपूर शहर: घातक शस्त्रासह धुमाकूळ घालणारा आरोपी तहसील पोलिसांच्या ताब्यात
20 मे ला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेयो हॉस्पिटलच्या सुरक्षा भिंतीजवळ, रामझुला समोर एका इसमाने हातात घातक शस्त्र घेऊन धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे.पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपीचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ३००/- रुपये किमतीचा एक लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे.अटकेतील आरोपीचे नाव मोहम्मद अरबाज उर्फ सानू उर्फ भांजा वल्द इसराईल अन्सारी असे सांगण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपा