औंढा नागनाथ: रस्ता पार करताना भरधाव दुचाकी चालकाने एकाच उडवले; जिंतूर की पॉईंट जवळील घटना, चालकासह दोघे गंभीर जखमी
औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर जिंतूर टी पॉइंट येथे पायदळ रस्ता पार करताना दुचाकी क्रमांक एम एच 38 एस 0190 वरील भरधाव दुचाकी चालकाने एका व्यक्तीस उडवले यानंतर दुचाकी फोडून झालेल्या अपघातात चालकासह दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 28 नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली शेख ख्वाजा शेख जानी वय 50 वर्ष व चालक तुकाराम वामन ढोके वय 35 वर्ष असे गंभीर जखमींची नावे आहेत त्यांना तात्काळ जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज या रुग्णवाहितीने हिंगोली येथे उपचारासाठी दाखल केले