अलिबाग: अवकाळी पावसाने आंबा-काजू बागांचे मोठे नुकसान; मदतवाटपाच्या विलंबावर मंत्री भरत गोगावले नाराज
Alibag, Raigad | May 9, 2026 रायगड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही भागांत तब्बल ९० टक्क्यांपर्यंत हानी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी आढावा बैठकीत मदतवाटपातील विलंबाबाबत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.