महागाव: शहरातील खडका रोडवर मेडिकल दुकानदारास ४५ हजारांने लूटले, महागाव पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल
महागाव शहरातील खडका रोडवर तिघा अज्ञात इसमांनी मेडिकल दुकानदारास ४५ हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दि. १८ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजताच्या दरम्यान महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, वसंता केशव टेकाळे (वय ६३, रा. गणेशवार्ड, पुसद) हे दिनांक १७ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास हिवरा येथील मेडिकल दुकान बंद करून दुचाकीने पुसदसाठी निघाले होते. दरम्यान घटना घडली.