यावल: मनवेल येथे विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा यावल ग्रामीण रुग्णालयात मृत्यू,यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
Yawal, Jalgaon | Sep 22, 2025 यावल तालुक्यात मनवेल हे गाव आहे. या गावातील रहिवाशी योगेश राजेंद्र इंधाटे वय २७ या तरुणाने कसले तरी विषारी औषध प्राशन केले होते. हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.