भोकरदन: हसनाबाद येथे घेण्यात आला ओबीसी मराठा प्रमाणपत्रा संदर्भात विशेष कॅम्प
आज दिनांक 29 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे भोकरदन तहसील कार्यालयामार्फत मराठा व कुणबी यांच्या प्रमाणपत्रात संदर्भात विशेष कॅम्प घेण्यात आला आहे. हैदराबाद मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीचा हा विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्पमध्ये तहसील कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होत योग्य ते कागदपत्र आज एकत्र केले असल्याचे पाहायला मिळाले आहे.