नागपूर शहर: नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला;गुन्हा दाखल
नागपूर मध्यवर्ती कारागृहात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर काही कैद्यांनी मिळून हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.काल, कारागृह शिपाई संदीप काळे हे कारागृहात कर्तव्यावर होते. कारागृह अधीक्षकांसोबत ते कारागृहाची पाहणी करत असताना, त्यांना 'बडी गोलाई' येथील १० नंबर बॅरेकजवळ काही कैद्यांच्या भांडणाचा आवाज आला.