फलटण: सासवड येथे विनापरवाना पेट्रोल विक्री करणाऱ्यावर लोणंद पोलिसांत गुन्हा दाखल, १२ लिटर पेट्रोल जप्त
Phaltan, Satara | Sep 10, 2024 सोमवार दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास सासवड ता. फलटण येथे एका किराणा दुकानाच्या बाजूला मानवी जिवीताला धोका होईल अथवा अन्य व्यक्तींना दुखापत व नुकसान पोहोचण्याची शक्यतेचा संभाव असताना अजित भुजंग कारंडे (वय 39 रा. सासवड) हा बेकायदा बिगर परवाना 1 हजार 260 रुपयांचे 12 लिटर पेट्रोल हा ज्वालाग्राही द्रवपदार्थ विक्री करताना मुद्देमालासह लोणंद पोलीसांना मिळून आला.पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर तोटेवाड यांनी फिर्याद दिली.पोलीस हवालदार संजय बनकर अधिक तपास करीत आहेत.