अकोट: पोपटखेड मार्गावरील ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर येथिल स्ट्राँग रुम येथे मतदान पथकांनी
पोहचवल्या इव्हीएम पेट्या
Akot, Akola | Dec 2, 2025 नगरपालिका निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी शहरातील 90 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली दरम्यान संध्या. ५.३० वाजता मतदान संपल्यानंतर विविध मतदान केंद्रांवरील मतदान पथक ही सील केलेल्या ईव्हीएम पेट्या घेऊन पोपटखेड मार्गावरील ट्रायसेम सेंटर येथील स्ट्रॉंग रूम येथे ईव्हीएम पेट्या घेऊन परतले.पोपटखेड मार्गावरील ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर येथे ईव्हीएम पेट्यांसाठी स्ट्रॉंग रूम बनवण्यात आले असून याच ठिकाणी मतदान मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे तर या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय.