नागपूर शहर: कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा! जरीपटक्यात दामवानी कुटुंबावर लोखंडी रॉडने भीषण हल्ला; आरोपी अजुनही मोकाट
उपराजधानी नागपूर शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस चिंताजनक वाढ होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या सुरक्षेवर आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच जरीपटका परिसरात उघडकीस आली आहे.