नागपूर शहर: एनसीसी कामाच्या ठिकाणाहून लोखंडी खांब चोरणारी टोळी जेरबंद: बाबुराव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दोन मेला सायंकाळी सहा वाजता दिलेल्या माहितीनुसार,पाचपावली पोलिसांनी कमल चौक परिसरात सुरू असलेल्या एनसीसी प्रकल्पाच्या बांधकाम स्थळावरून लोखंडी खांब चोरणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका पुरुषासह चार महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.