नागपूर शहर: दारूच्या नशेत शिव्या दिल्याने जितेंद्र तांडेकरची,हत्या आरोपीला अटक;: प्रशांत ठवरे पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांनी 30 जून ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र उर्फ पप्पू तांडेकर यांची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखा युनिट-१ ने बेड्या ठोकल्या आहेत. सुमित रविंद्रकुमार शुक्ला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून तपास करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आई बहिणी वरून शिव्या दिल्याने हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे.