जालना: जालन्यात तरुणाचा चाकू हल्ला करुन खून; मियांसाहेब दर्गा चौकातील घटना; शहरात खळबळ; दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती
Jalna, Jalna | Sep 25, 2026 जालना शहरातील मियांसाहेब दर्गा चौक परिसरात राहुल राजेंद्रसिंग राजपूत या तरुणावर चाकूने हल्ला करुन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. दोन जणांनी राहुल याच्यावर धारदार चाकूने हल्ला केल्यानंतर दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला. शुक्रवार दि. 25 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुलला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.