पिंपळनेर येथे थेट महाविद्यालयाच्या गेटजवळच चारचाकी वाहनातून आलेल्या तिघा तरुणांनी अल्पवयीन विद्यार्थिनींना अडवून धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी भयभीत झालेल्या १७वर्षीय विद्यार्थिनीने पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर विद्यार्थिनी पिंपळनेर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती आपल्या मैत्रिणींसह महाविद्यालयाच्या गेटजवळील डांबरी रस्त्याने पायी जात असताना अचानक पांढऱ्या रंगाची कार त्यांच्या जवळ येऊन थांबली