धाडसी पाठलाग करत दोन आरोपींना पकडले; डीसीपी रमेश धुमाळ यांची तत्पर कारवाई! 🚔
दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी कोराडी येथून प्राप्त झालेल्या कॉलनंतर पोलीस अधिकारी कोराडी पोलीस ठाण्याकडे जात असताना, पागलखाना चौक–मानकापूर मार्गावर दोन युवक संशयास्पदरीत्या दुचाकीवरून जाताना आढळले.
त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी वाहनाने त्यांचा पाठलाग सुरू केला. आरोपी भरधाव वेगाने वाहन चालवत पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. काही अंतरावर त्यांनी वाहन सोडून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, डीसीपी रमेश धुमाळ आणि त्यांच्या चालकाच्या तत्परतेमुळे दोन्ही आरोपींना पाठलाग करून पकडण्यात यश आले.
पुढील चौकशीत एका आरोपीविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे तसेच त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे समोर आले.
मानकापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
कर्तव्यनिष्ठा, प्रसंगावधान आणि धाडस! नागपूर शहर पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर.
#NagpurCityPolice #NagpurPolice #PoliceAction #DCP #MankapurPolice #PoliceOnDuty #PublicSafety
Nagpur, Maharashtra | Nov 16, 2026