सदर पोलीस स्टेशनचे अधिकारी एपीआय नरेंद्र तायडे यांना फोन द्वारे अश्लील भाषेत धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीला सदर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. आरोपीने तब्बल दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली होती आणि तीन दिल्यास पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून तिला ठार मारण्याची आणि नागपुरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची गंभीर धमकी दिली होती.