नागपूर शहर: एमआरआय काढायला गेलेल्या वृद्धाची दोन लाख 70 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरीला
सीताबर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एमआरआय काढण्यासाठी गेलेल्या ६१ वर्षीय वृद्धाची ३० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी चोरीला गेल्याची घटना घडली आहे.फिर्यादी हे विनोद उत्तमराव कडू (वय ६१ वर्षे हे पल्स इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, गिरीपेठ येथे एम आर आय काढायला गेले होते.वैद्यकीय तपासणीसाठी एमआरआय करण्यापूर्वी फिर्यादी यांना अंगावरील धातूच्या वस्तू काढून ठेवण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी आपली ३० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी बाहेरील खुर्चीवर ठेवली.