जालना: रहेमानगंजमध्ये घराच्या बांधकामावरून वाद; घरात घुसून तोडफोड केल्याचा आरोप; लघवी करण्यास मज्जाव केल्याच्या कारणातून वाद
Jalna, Jalna | Sep 24, 2026 जालना शहरातील रहेमानगंज परिसरात घराच्या बांधकामावरून सुरू असलेल्या वादातून चौघांनी घरात घुसून भिंतीची तोडफोड करून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच घराचे काम करणार्या मजुरांना शिवीगाळ करून काम बंद करण्याची धमकी दिल्याची तक्रार सदर बाजार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. गुरुवार दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हुतयाब शोएब जहागीरदार रा. रहेमानगंज, विवेकानंद हॉस्पिटलसमोर, जालना यांचा वैद्यकीय साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे.