जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या घसरल्याने सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे. वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असला, तरी या हवामान बदलाचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होताना दिसत आहे. रब्बी पिकांच्या वाढीसाठी थंड हवामान पोषक मानले जाते. सध्या पडत असलेल्या थंडीमुळे जिल्ह्यातील गहू, हरभरा व मका या पिकांची वाढ जोमदार होण्यास मदत होणार आहे या बाबतची माहिती आज दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.