असंख्य शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्याऱ्या गंगाखेड येथील जी 7 साखर कारखाना आणि लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याने सुरू असलेल्या गळीत हंगामात पहिली उचल 3 हजार व अंतिम भाव 4 हजार रु देण्यात यावा याकरिता आज सोमवार 15 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून गंगाखेड तालुक्यातील खळी पाटी येथे परभणी गंगाखेड परळी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको केले. सलग 5 तासापासून हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने परळी-परभणी मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती.