नागपूर शहर: नीट परीक्षेचा गोंधळ सुरूच: नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट 'अबू धाबी'चे केंद्र!
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या गलथान कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नीट पेपर फुटीच्या प्रकरणानंतर आता परीक्षा केंद्रांच्या नियोजनातील अनागोंदीमुळे विद्यार्थी आणि पालक हवालदिल झाले आहेत. नागपूरमधील एका विद्यार्थ्याला त्याच्या परीक्षा केंद्रासाठी चक्क संयुक्त अरब अमिरातीमधील 'अबू धाबी' हे ठिकाण देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.