नागपूर शहर: खापरखेडा येथे भीषण अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
* खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव रंगाारी येथील सन राईझ हॉटेलजवळ १८ मे रोजी मध्यरात्रीच्या बारा वाजून 45 मिनिटांच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात निखिल संजय चकोले या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निखिल चकोले हा आपल्या ताब्यातील वाहन घेऊन जात असताना, त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन रस्त्याच्या दुभाजकाला धडकून पलीकडच्या बाजूला गेले आणि सावनेरकडून येणाऱ्या एका ट्रकवर समोरून जाऊन धडकले. या अपघातात निखिल गंभीर जखमी झाला.