नागपूर शहर: कार चोरी करणाऱ्या कुख्यात आरोपीला अटक : रश्मिता राव पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त रश्मीता राव यांनी 14 जूनला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चोरी करणाऱ्या कुख्यात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हुडकेश्वर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमाने तपास करत ही कार्यवाही केली आहे. यामध्ये आरोपीच्या अल्पवयींन साथीदाराला देखील ताब्यात घेतले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी दिली आहे.