नागपूर शहर: ज्या ठिकाणी पोलिसा उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला केला त्याच ठिकाणाहून काढली आरोपींची धिंड
कळमना पोलीस स्टेशनचे पीएसआय सचिन वाकलेकर यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. महेंद्र उईके, धर्मेंद्र सयाम आणि सोनू मरसकोल्हे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यानंतर, पोलिसांनी या गुन्हेगारांची त्याच ठिकाणी धिंड काढली, जिथे त्यांनी हा गुन्हा केला होता. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आणि गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.