मानगाव: कौटुंबिक वादातून विष प्राशन: आईसह २ चिमुकल्यांचा मृत्यू
Mangaon, Raigad | Jun 14, 2026 माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे शनिवारी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून एका ३३ वर्षीय विवाहित महिलेने स्वतः विष प्राशन करत आपल्या चार मुलांनाही विषारी पेय पाजल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला असून एक मुलगा व एक मुलगी यांच्यावर गंभीर अवस्थेत माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत.