नागपूर शहर: विदर्भात उष्णतेची लाट; येत्या दिवसात मिळू शकतो दिलासा
विदर्भात सध्या उष्णतेची लाट सुरू असून तापमानाचा पारा चढाच आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना आज 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे, कारण येथील तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.याव्यतिरिक्त, नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्यापासून (२८ एप्रिल) उष्णतेची लाट काहीशी कमी होण्याची शक्यता.