नाशिक: गंगापूर परिसरातील संत कबीर नगर मांगिरबाबा येथे मोटरसायकलच्या धडकेत औषध उपचारादरम्यान 24 वर्षे तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
Nashik, Nashik | Sep 15, 2025 गंगापूर परिसरातील संत कबीर नगर मांगिरबाबा येथे मोटरसायकलच्या धडकेत औषध उपचारादरम्यान 24 वर्षे तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून संध्याकाळी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अर्चना संतोष आठवने वय 24 राहणार मांगिरबाबा चौक संत कबीर नगर या भोसला मिलेटरी गेट येथून पायी जात असताना जेहान सर्कल येथे मोटर सायकल चालक आर्यन तुषार देवरे यांनी भरदाव वेगाने त्यांना धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने औषध उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.