एरंडोल: कासोदा या गावातील जुना आडगाव रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या पत्री शेळमधून बैलजोडी चोरी, कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
एरंडोल तालुक्यात कासोदा हे गाव आहे. या गावातून जुना आडगाव रस्ता आहे. या रस्त्यावर शेतकरी समाधान पवार यांनी त्यांची पन्नास हजार रुपये किमतीची बैल जोडी बांधली होती. ती बैल जोडी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी बैल जोडीचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र बैल जोडी कुठेच मिळून आली नाही म्हणून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.