बोदवड: सावदा वाघोदा बुद्रुक विशाल ट्रान्सपोर्ट समोर दुचाकीला दुचाकीची धडक, एक ठार, सावदा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Oct 20, 2025 सावदा ते वाघोदा बुद्रुक या गावादरम्यान अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गावर हॉटेल महिंद्रा जवळ विशाल ट्रान्सपोर्ट आहे. येथे दुचाकी क्रमांक एम. एच.१९ एन.२९०८ याद्वारे विजय भोगे व लखीचंद भोगे जात होते. तेव्हा त्यांच्या दुचाकीला दुचाकी क्रमांक एम.एच.१९ ए.डी.०३०९ वरील अज्ञात चालकाने धडक दिली. या अपघातात लकीचंद भोगे वय ७० हे वृद्ध जागीच ठार झाले. तेव्हा या अपघात प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.