तालुक्यातील मुद्देशवाडगाव येथील शरीफ रसूल शेख (वय ६२) हे गुरुवारी (दि. ४) दुपारी साडेतीनच्या सुमारास मांजरी शिवारातून दुचाकीने गंगापूर-वैजापूर मार्गावरील हकिगतपूर शिवारातील घराकडे जात होते. यावेळी मागून आलेल्या दुचाकी चालकाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.