🚨 अवैध गर्भलिंग निदानाविरोधात करवीर पोलिसांची मोठी कारवाई
गुप्त माहितीच्या आधारे करवीर पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश केला. तपासादरम्यान एजंट, सहकारी आणि लॉज मालक यांच्यासह एकूण ७ आरोपी निष्पन्न करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध PCPNDT कायदा तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुलींच्या जन्माचा अधिकार अबाधित राखण्यासाठी आणि स्त्रीभ्रूण हत्येस आळा घालण्यासाठी कोल्हापूर पोलीस कटिबद्ध आहेत.
#KolhapurPolice #KarveerPolice #PCPNDT #SaveGirlChild #MaharashtraPolice
Kolhapur, Maharashtra | Jul 28, 2026