औंढा नागनाथ: शहरातील बसस्थानक परिसरात शेताच्या भांडणावरून जीवे मारण्याची धमकी नागेशवाडी येथील एकावर औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शेतीच्या भांडणाच्या कारणावरून नोटीस का पाठवली या कारणावरून फिर्यादीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दिनांक सात ऑक्टोबर मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास औंढा नागनाथ बस स्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी अशोक नाईक राहणार नागेशवाडी यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विश्वनाथ कराळे राहणार नागेशवाडी यांच्यावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिनांक ८ ऑक्टोबर बुधवार रोजी सायंकाळी चार वाजे दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला.