परभणी शहरातील जिंतूर रोडवरील ईदगाह मैदानात असलेली एक अलमारी ज्यामध्ये नमाज पठण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जायनमाज ठेवलेले असतात त्यास भीषण आग लागल्याची घटना आज शनिवार 13 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.